गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील पोलिसांनी धर्मांतरात गुंतलेल्या एका टोळीचे षड्यंत्र उघड करत मोहंमद राहिल, मुशीर आणि अब्दुल अहमद या ३ धर्मांधांना अटक केली. या टोळीशी संबंधित उर्वरित आरोपी आणि त्यांना पैसा पुरवणारे स्रोत यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी एका हिंदु मुलीच्या वडिलांनी खोडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. आपली मुलगी गेल्या ५-६ मासांपासून इस्लामी चालीरितींचे पालन करत असून तिने नमाजपठण करणे चालू केले आहे. तिने ती स्वत: मानवी बाँब बनण्याविषयी वक्तव्य केले आहे, असे वडिलांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी इस्लामी धर्मांतराचे षड्यंत्र उघड केले.
गाजियाबाद में धर्मांतरण के बड़े रैकेट का पर्दाफाश, गाजियाबाद पुलिस ने रैकेट के 3 लोगों को किया गिरफ्तार #religiousconversion #UPConversion pic.twitter.com/CkYzlpyVXG
— India TV (@indiatvnews) July 9, 2023
सदर मुलीच्या भ्रमणभाषमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ जुलै २०२३ या दिवशी २२ वर्षीय मोहंमद राहिल याला सर्वप्रथम अटक केली. त्याने पोलिसांना सांगितले की, तो पूर्वी हिंदु होता. त्याने वर्ष २०१७ मध्ये इस्लाम स्वीकारला. तो हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडत होता. त्याने सदर मुलीशी ऑनलाईन लग्नही केले होते आणि तिला इस्लाम पंथ स्वीकारण्याच्या टप्प्यावर आणले होते.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार आरोपी महंमद राहिल आणि टोळीतील इतर साथीदार यांचे जाळे केवळ कर्नाटक आणि देशातील इतर राज्यांमध्येच नाही, तर नेपाळपर्यंत पसरले आहे. या टोळीशी संबंधित अनेक लोक सापडले आहेत. मोहंमद राहिलच्या भ्रमणभाषमधून तक्रारदाराच्या मुलीचे काही आक्षेपार्ह व्हिडिओही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून कारागृहात पाठवले. या टोळीने आतापर्यंत मुला-मुलींसह एकूण ४० जणांचे धर्मांतर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांधांचे असे धाडस होऊ नये, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे ! |