उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’ची दोन प्रकरणे उघड !
डेहराडून (उत्तराखंड) – राज्यात लव्ह जिहादची दोन प्रकरणे समोर आली आहेत. एक प्रकरण रुद्रपूर येथील सितारगंज क्षेत्रातील असून येथे एका मुसलमान युवकाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासमवेत राहू लागला. १० जुलै या दिवशी पीडितेने पोलिसांकडे तक्रार नोंदवतांना सांगितले की, संबंधित मुसलमान तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता. अन्य एका प्रकरणात हल्द्वानी येथील काठगोदाम क्षेत्रामध्ये एका हिंदु मुलीचे अपहरण करणारा सैफ याला ८ जुलै या दिवशी अटक करण्यात आली.
पहिल्या घटनेमध्ये रुद्रपूर येथे एका घटस्फोटित हिंदु महिलेला एका मुसलमान युवकाने हिंदु असल्याचे भासवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले. कालांतराने तो तिचे शारीरिक शोषण करू लागला आणि तिच्याकडून १ लाख रुपये उकळले. पुढे पीडितेला त्याची मुसलमान ओळख कळल्यावर तो तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणू लागला. पीडितेने यास विरोध केल्यावर त्याने तिला विकण्याचा प्रयत्न केला. आता तो अन्य एका मुलीसोबत रहात आहे.
दुसर्या प्रकरणात नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथे सैफ या युवकाने एका हिंदु मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिचे अपहरण केले. मुसलमानबहुल भागात रहाणार्या मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, एका जुन्या प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी त्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी १० जुलै या दिवशी सैफ याला अटक केली.
संपादकीय भूमिकाहिंदु महिलांचे जीवन उद्धवस्त करणार्या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी आता मृत्यूदंडाचे प्रावधान असणारा लव्ह जिहादविरोधी कायदा राष्ट्रीय स्तरावर करणे अत्यावश्यक ! |