रहाटणी (जि. पुणे) येथे धर्मांतर करण्‍यासाठी महिलेवर दबाव !

बळजोरीने मनपरिवर्तन करण्‍याचा प्रयत्न

पुणे – ‘बायबल वाचा’, ‘येशू ख्रिस्‍त्‍यांवर विश्‍वास ठेवा’, असे सांगत पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील एका महिलेचे धर्मांतरासाठी मनपरिवर्तन करण्‍याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली आहे. या प्रकरणी ३ ख्रिस्‍ती महिलांना नोटीस बजावून समज दिल्‍याची माहिती वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिली आहे.

१. तक्रारदाराच्‍या घरी ३ ख्रिस्‍ती महिला वारंवार येऊन ‘ख्रिस्‍त्‍यांवर विश्‍वास ठेवा’, असे सांगून बायबल वाचून दाखवत होत्‍या. त्‍यांनी विरोध केल्‍यानंतरही त्‍या बळजोरीने घरी येत होत्‍या.

२. १० जुलै या दिवशी ३ महिला दुपारी ३ वाजता घरामध्‍ये घुसल्‍या. ‘येशूवर विश्‍वास ठेवा’, अशी दमदाटी करत राहिल्‍या.

३. तक्रारदार महिलेने पुतण्‍यास बोलावून त्‍यांना घराबाहेर काढण्‍याचा प्रयत्न केला, तरी त्‍या जात नसल्‍याने पोलिसांना बोलवण्‍यात आले.

संपादकीय भूमिका :

बळजोरीने धर्मांतर करणार्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासमवेत लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा सर्व ठिकाणी लागू करणे आवश्‍यक !