Ram Mandir : अयोध्या येथे झालेल्या श्रीरामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

अयोध्या येथे या वर्षी जानेवारीत झालेल्या श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च झाले. ही माहिती ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या बैठकीत ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली. १६ ते २२ जानेवारी या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

खोट्या कथानकांविरुद्धचा लढा !

जगभरातील दुष्ट शक्ती पुष्कळ जागृत झाल्या आहेत. सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत; पण केवळ भारतात सनातन धर्म अजूनही टिकून आहे. त्याला नष्ट करण्यासाठी शेकडो प्रयत्न चालू आहेत. हिंदूंनी या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

US India Day Parade : संचलनातील श्रीराममंदिराच्या देखाव्यामुळे भारतीय वंशाच्या अमेरिकी मुसलमानांनी घेतला नाही सहभाग !

न्यूयॉर्कमध्ये ४२ व्या भारत दिवस संचलनाचे (‘इंडिया डे परेड’चे) आयोजन करण्यात आले होते; मात्र त्याच संचलनातील श्रीराममंदिराच्या देखाव्याला ‘मुसलमानविरोधी’ म्हणत तो हटवण्याची मागणी केली होती.

Ram Mandir At India Day Parade : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे भारतदिनाच्या संचलनात श्रीराममंदिराचा समावेश करण्याच्या निर्णयाला हिंदुद्वेष्ट्यांचा विरोध !

संचलनाचे आयोजक असणार्‍या ‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन’ने एक निवेदन प्रसारित करून म्हटले आहे की, आम्ही एक शांततापूर्ण सामुदायिक उत्सव आयोजित करत आहोत; परंतु आमची कठोर तपासणी केली जात आहे.

श्रीराममंदिराविषयी अफवा पसरवणार्‍या मुसलमानाला अटक

अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा व्हायला हवी ! अशा गुन्हेगारांविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव जोपासणारे राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ?

Ramlalla : १४ जुलैपर्यंत २ कोटी भाविकांनी घेतले श्री रामलल्लाचे दर्शन ! 

मंदिरात प्रतिदिन सुमारे १ लाख १२ सहस्र भाविक येत आहेत. सध्‍या उत्तर भारतात चालू असलेल्‍या श्रावण मासामध्‍ये या संख्‍येत वाढ होऊ शकते.

India Day Parade : अमेरिकेतील ‘इंडिया डे परेड’च्या कार्यक्रमात दिसणार श्रीराममंदिराचा देखावा !

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताबाहेर आयोजित करण्यात येणारा हा सर्वांत मोठा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमाद्वारे न्यूयॉर्कमध्ये भारताच्या महान संस्कृतीविषयी विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे.

राममंदिराच्या पुजार्‍यांचा पेहरावाचा रंग आता पिवळा; मोबाईलवरही बंदी !

अयोध्येतील राममंदिराच्या व्यवस्थेत पालट करण्यात आला आहे. मंदिराच्या पुजार्‍यांचा पेहराव पालटला आहे. पुरोहितांचा पेहरावाच्या कपड्यांचा रंग आता भगव्यावरून पिवळा करण्यात आला आहे. याखेरीज त्यांना मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Uma Bharti : प्रत्‍येक रामभक्‍ताचे मत आपल्‍यालाच मिळेल, हा विचार अयोग्‍य ! – उमा भारती

ज्‍यांनी मते दिली नाहीत, तेसुद्धा रामभक्‍त आहेत, असे वक्‍तव्‍य भाजपच्‍या माजी खासदार उमा भारती यांनी केले.

Ayodhya Ram Mandir : मंदिर उभारणीच्या दर्जात कोणतीही तडजोड नाही ! – नृपेंद्र मिश्रा यांचे स्पष्टीकरण

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या गर्भगृहात पावसाचे पाणी साचल्याचे प्रकरण