अयोध्या – अयोध्येत ११ जानेवारीला श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा तिथीनुसार प्रथम वर्धापनदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी श्री रामलल्लाची विशेष पूजा करण्यात आली. पुजार्यांनी श्री रामलल्लांना पंचामृत आणि नंतर गंगाजलाने अभिषेक केला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. राममंदिरामुळे विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यास साहाय्य होईल, असे ते म्हणाले. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत उपस्थित राहून रामलल्लाची महाआरती केली.
मंदिर विश्वस्त मंडळाच्या म्हणण्यानुसार वर्धापनदिनी २ लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेतील. अयोध्येत ११ ते १३ जानेवारीपर्यंत उत्सव साजरा होत आहे. या कालावधीत सकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत सामान्य दर्शन चालू राहील.