
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे येथील ‘संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालया’त उपचार चालू असतांना निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. ‘स्ट्रोक’चा झटका आल्यामुळे ३ फेब्रुवारी या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ११ फेब्रुवारीला उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली होती.
६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरीचा ढाचा कोसळण्याच्या आधीपासून आचार्य सत्येंद्र दास राममंदिरात पुजारी म्हणून काम करत होते. ते निर्वाणी आखाड्याचे सदस्य होते.