शिरोली येथील हिंदु धर्मसभेत हिंदुत्वाचा हुंकार !

कोल्हापूर, २५ जानेवारी (वार्ता.) – जे लोक अयोध्या येथे श्रीराममंदिर होणार नाही, असे म्हणत होते त्यांच्या डोळ्यांसमोरच आज भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. हे मंदिर निर्माण होण्यासाठी २ सहस्रांपेक्षा अधिक श्रीरामभक्तांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली, हे आपण विसरता कामा नये. यापुढील काळात अयोध्येनंतर वर्ष २०२९ पर्यंत काशी आणि मथुरा येथेही भव्य मंदिरे झालेली दिसतील. इतकेच नाही, तर ४० सहस्र मंदिरे इस्लामिक अतिक्रमणापासून कायदेशीर मार्गाने लढा देऊन ती मुक्त करू, असे प्रतिपादन भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. ते शिरोली येथे शक्ती जागर मंच आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित जाहीर हिंदु धर्मसभेत बोलत होते.

या प्रसंगी व्यासपिठावर काडसिद्धेश्वर मठाचे पू. चिदानंद स्वामीजी, भाजपच्या सौ. रूपाराणी निकम, उद्योजक श्री. विशाल जाधव आणि श्री. संताजीबाबा घोरपडे उपस्थित होते. प्रास्ताविक शक्ती जागर मंचचे श्री. सचिन पोवार यांनी केले. प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने हिंदू तरुण-महिला उपस्थित होते. श्रीराममंदिराच्या वर्षपूर्तीनिमित्त याचे आयोजन केले होते. सौ. रूपाराणी निकम यांनी ‘वाढता लव्ह जिहाद आणि त्यावरील उपाययोजना’ यांवर मार्गदर्शन केले.
We pledge to free 40,000 temples from I$l@m!c encroachment through legal means in the upcoming years. –
BJP’s Devout Hindu MLA @TigerRajaSingh Singh at the Hindu Dharma Sabha in Shiroli (Kolhapur District, Maharashtra).Sri Singh further added:
▫️Every Hindu should write a… pic.twitter.com/OzPNBZnxT7— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 26, 2025
लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्यासाठी प्रत्येक हिंदूने पंतप्रधानांना पत्र लिहावे !
आज हिंदु ‘हम दो हमारे दो’, इतक्यावरच थांबतांना दिसत आहेत. याउलट अहिंदूंची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास काही वर्षांनी हिंदू अल्पसंख्य होतील. त्यामुळे सर्व धर्मांना लागू असा ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा’, या मागणीसाठी प्रत्येक हिंदूने एक पत्र पंतप्रधानांना लिहावे, असे आवाहन याप्रसंगी टी. राजासिंह यांनी केले.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारा सैफ अली खान प्रसिद्धीमाध्यमांसाठी ‘हिरो’ हे दुर्दैव !
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी एका बांगलादेशी घुसखोराने आक्रमण केले. यानंतर दूरचित्रवाहिन्यांवर त्याचे वर्णन एखाद्या ‘हिरो’सारखे करण्यात येत होते. सैफ अली खान याने २ विवाह हिंदू अभिनेत्रींसमवेत केले आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारा सैफ अली खान प्रसिद्धीमाध्यमांसाठी ‘हिरो’ असणे, हे दुर्दैवी आहे.
महाराष्ट्र औरंगजेबाचा नसून तो छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे, हे आज ठणकावून सांगण्याची आवश्यकता !
काही दिवसांपूर्वी वाघोदा (जळगाव) येथे मुसलमानांनी काढलेल्या संदलमध्ये (मिरवणूक) औरंगजेब, टिपू सुलतान आणि ओवैसी बंधू यांचे फलक झळकवण्यात आले होते. ज्या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदूंची हत्या केली, तो औरंगजेब आमच्यासाठी आदर्श नसून महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे, हे आज ठणकावून सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

असदुद्दीन ओवैसीला ‘पॅलेस्टाईन’ प्रती प्रेम वाटते; पण बांगलादेशातील हिंदूंविषयी काही वाटत नाही !
संसदेत खासदार असदुद्दीन ओवैसीने ‘जय पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या होत्या. त्याला बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचाराविषयी प्रश्न विचारल्यावर ‘बांगलादेशाशी आपला काय संबंध ?’, असे उत्तर दिले होते. जर बांगलादेशाशी आपला संबंध नाही, तर ‘पॅलेस्टाईन’शी आपला संबंध कसा असू शकेल ? ओवैसीला पॅलेस्टाईनविषयी एवढे प्रेम का ? यावरून असदुद्दीन ओवैसीला ‘पॅलेस्टाईन’बद्दल प्रेम वाटते; पण बांगलादेशातील हिंदूंविषयी काही वाटत नाही, हेच सिद्ध होते.
या प्रसंगी पू. चिदानंद स्वामीजी यांच्या हस्ते टी. राजासिंह यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देण्यात आली, तर शक्ती जागर मंचच्या वतीने टी. राजासिंह यांना श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा भेट देण्यात आली.
विशाळगडावर आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून विशाळगड लवकरच अतिक्रमणापासून मुक्त झाला पाहिजे. तिथे जी अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत, ती तात्काळ जमीनदोस्त केली पाहिजेत, अशी मागणी टी. राजासिंह यांनी केली.