अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराचे संपूर्ण बांधकाम जून २०२५ पर्यंत नाही, तर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. परकोटाच्या (मंदिराच्या भोवताली प्रदक्षिणा घालण्यासाठी बांधण्यात येणारा मार्ग) बांधकामात अनुमाने एक किलोमीटरचा परिघ आहे. त्यात ६ मंदिरे बांधली जाणार आहेत. यांपैकी अनुमाने ८.५० लाख घनफूट बनशी पहारपूर दगडाची आवश्यकता आहे. दगडही आले आहेत; परंतु २०० कामगारांच्या कमतरतेमुळे बांधकामाला विलंब होत आहे, अशी माहिती बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.
नृपेंद्र मिश्रा पुढे म्हणाले की, श्रीराममंदिरात बसवलेले संगमरवरी दगड अनेक ठिकाणी कमकुवत दिसत आहेत. यामुळे कमकुवत मार्बल काढून मकराना मार्बल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीराममंदिराच्या तळमजल्यावरील गुढी मंडपाच्या भिंती आणि खांब यांवर पांढरा संगमरवर वापरण्यात आला आहे, तसेच गर्भगृह वगळता मंदिराच्या पहिल्या मजल्यावर संगमरवर बसवण्यात आले आहे.