गदग (कर्नाटक) – कर्नाटक राज्याच्या गदग जिल्ह्यातील नरगुंद येथील रहिवासी हासिमसाब अक्षरसाब काझी याने राममंदिराच्या छायाचित्रावर अवमानकारक मजकूर लिहून सामाजिक माध्यमावर प्रसारित केला होता. या प्रकरणी न्यायालयाने हासिमसाब काझीला दोषी ठरवून २ महिन्यांचा कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. (भारतियांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाविषयी अवमानकारक विधान करण्याचे धाडस कुणी करू शकणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे ! – संपादक)
२६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी हासिमसाब काझी याने राममंदिराच्या चित्रावर हिंदी आणि इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहून सामाजिक माध्यमावर ‘पोस्ट’ प्रसारित केल्या होत्या. याला गंभीरतेने घेत पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २९५च्या अंतर्गत गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले होते. न्यायाधीश जिन्नप्पा चौगला यांनी युक्तीवाद ऐकून १८ फेब्रुवारी या दिवशी आरोपीला शिक्षा ठोठावली.