योगी अरविंद यांना अपेक्षित राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ७५ वर्षांपूर्वी योगी अरविंद यांचे अवतरण होणे आणि त्यांच्या १५० व्या जयंतीला भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असणे, ही एक विलक्षण गोष्ट !

(म्हणे) ‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात !’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !

वीज आणि पाणी ग्राहकांसाठी ‘क्यू.आर्. कोड बिलींग’ सुविधा उपलब्ध करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘स्मार्ट वॉटर मिटरींग’च्या माध्यमातून महसूल गोळा करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ! गोव्यातील पिण्याचे पाणी १४ राष्ट्रीय प्रयोगशाळांमधून तपासले जाते.’’

‘हर घर तिरंगा’ अभियानाला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद !

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रशासनाकडून १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानानुसार देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये एका विश्‍वविद्यालयातील स्पर्धेमध्ये फडकावण्यात आला भारताचा राष्ट्रीय ध्वज !

या विश्‍वविद्यालयातील एका स्पर्धेमध्ये शहरातील शहिदा इस्लाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून हा झेंडा फडकावण्यात आला; मात्र लगेच त्याला रोखण्यात आले. हे विद्यार्थी एकेका देशाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यात भारताचाही समावेश होता.

मुसलमान संघटनांच्या विरोधानंतर मंगळुरू विश्‍वविद्यालयात भारतमातेची पूजा रहित !

हिजाब हा धार्मिक, तर भारतमाता हा राष्ट्रीय अस्मितेचा  विषय आहे. जर कुणी तिची पूजा करत असेल, तर त्यात चुकीचे काय ? जे भारतमातेलाच मानत नाहीत, तेच अशा प्रकारचा विरोध करतात ! अशांच्या विरोधाला विश्‍वविद्यालयाने बळी पडू नये !

चोपडा येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल’ ही अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकार्‍यांकडून नोटीस !

पोद्दार शाळेने वेगळ्या उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे शाळेचे विश्‍वस्त, तसेच संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात पुरावे मिळाले, तर त्यावर बंदी घाला ! – सैयद नसीरुद्दीन चिश्ती

‘सिर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे) ही घोषणा इस्लामी नाही. जर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) विरोधात पुरावे मिळाले, तर तिच्यावर बंदी घाला, असे विधान ‘अखिल भारतीय सुफी सज्जादनशीन परिषदे’चे अध्यक्ष सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी केले.

पीएफ्आयच्या देहलीतील कार्यक्रमावर पोलिसांकडून बंदी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य कधी मिळणार ? – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक आतंकवाद आणि फुटीरावाद यांचे बळी ठरत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पहात आहेत.