‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात पुरावे मिळाले, तर त्यावर बंदी घाला ! – सैयद नसीरुद्दीन चिश्ती

अखिल भारतीय सुफी सज्जादनशीन परिषदे’चे अध्यक्ष सैयद नसीरुद्दीन चिश्ती

नवी देहली – ‘सिर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे) ही घोषणा इस्लामी नाही. जर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) विरोधात पुरावे मिळाले, तर तिच्यावर बंदी घाला, असे विधान ‘अखिल भारतीय सुफी सज्जादनशीन परिषदे’चे अध्यक्ष सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी केले. नवी देहलीमध्ये ३० जुलै या दिवशी या परिषदेकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चिश्ती बोलत होते. विशेष म्हणजे या वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेसुद्धा कार्यक्रमाच्या व्यासपिठावर उपस्थित होते.
यावरून आता सामाजिक माध्यमांतून चर्चा चालू आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, राजस्थानचे ‘अजमेर शरीफ’ येथील सेवेकरी आणि चिश्ती यांच्याकडून कन्हैयालाल अन् नूपुर शर्मा यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यावरून हिंदूंनी दर्ग्यावर अघोषित बहिष्कार घातला. त्याचाच परिणाम म्हणून इस्लामी संघटनांकडून ‘पी.एफ्.आय.’वर बंदीची मागणी केली जात आहे.