• आषाढी एकादशीनिमित्त‘मंदिर-मशीद दर्शन’ उपक्रम राबवल्याचे प्रकरण • हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम !• हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून गट शिक्षणाधिकार्यांना निवेदन • शाळा बंद न केल्यास कारवाईची गट शिक्षणाधिकार्यांची चेतावणी |
चोपडा (जिल्हा जळगाव) – नुकत्याच आषाढी एकादशीच्या दिवशी शहरातील ‘पोद्दार इंटरनॅशनल’ शाळेत राबवण्यात आलेल्या ‘मंदिर-मशीद दर्शन’ या विचित्र उपक्रमामुळे पालक आणि नागरिक यांच्यात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे या घटनेची चौकशी करून संबधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने चोपडा येथील गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांना देण्यात आले. याची नोंद घेत चोपडा डॉ. भोसले यांनी ‘पोद्दार इंटरनॅशनल’ शाळा अनधिकृतपणे चालू असल्याचे सांगत ती त्वरित बंद करण्याची नोटीस शाळेला बजावली आहे. शिक्षणाधिकार्यांनी सांगितले, ‘‘शाळेतील सर्व वर्ग बंद केल्याचा अहवाल सादर करावा. वर्ग बंद न केल्यास संबंधित संस्थाचालकांवर कारवाई करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या होणार्या शैक्षणिक हानीस शाळा उत्तरदायी असेल. अहवाल सादर न केल्यास संस्था आणि शाळा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’
हिंदुत्वनिष्ठांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. उदयपूर आणि अमरावती येथे हिंदूंची अत्यंत क्रूरपणे शिरच्छेद करण्याची घटना घडली असतांना, तसेच सर्वत्र सामाजिक वातावरण दूषित असतांना संवेदनशील अशा चोपडा शहरात ‘मंदिर-मशीद दर्शन’ उपक्रम कसा राबवला गेला ? त्यासाठी शिक्षण विभागाची अनुमती घेतली होती का ? विद्यार्थी पारंपरिक वेषभूषेत होते, ते भगव्या ध्वजासह मशिदीत जातांना कुणी माथेफिरूने गैरकृत्य केले असते, तर त्याचे दायित्व कुणाचे ?
२. पोद्दार शाळेने वेगळ्या उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे शाळेचे विश्वस्त, तसेच संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.