मुसलमान संघटनांच्या विरोधानंतर मंगळुरू विश्‍वविद्यालयात भारतमातेची पूजा रहित !

महाविद्यालयांमध्ये जर हिजाबला बंदी आहे, तर पूजा कशी काय होऊ शकते ? – मुसलमान संघटनांचा प्रश्‍न

मंगळुरू (कर्नाटक) – येथील मंगळुरू विश्‍वविद्यालयात ११ ऑगस्ट या दिवशी होणारी भारतमातेची पूजा रहित करण्यात आली आहे. जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय.’ची) विद्यार्थी शाखा ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (‘सी.एफ्.आय.’ने) यास विरोध केल्याने ही पूजा रहित करण्यात आली. या पूजेविषयीचे विश्‍वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेने भित्तीपत्रक लावले होते. त्यावर भारतातमातेच्या हातात तिरंग्याऐवजी भगवा ध्वज दाखवण्यात आला होता. त्याला विरोध करण्यात आला. या पूजेचे आयोजन करणार्‍या ‘युनिव्हर्सिटी स्टूडेंट युनियन’चे अध्यक्ष धीरज सपलिगा यांचे म्हणणे आहे की, वर्ष २०१४ पासून अशा प्रकारच्या पूजेचे आयोजन केले जात आहे.

१. सी.एफ्.आय. आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) यांच्याशी संबंधित विद्यार्थ्यांनी विश्‍वविद्यालयाच्या कुलपतींना पूजेचा कार्यक्रम रहित करण्याविषयी निवेदन दिले. त्यांचे म्हणणे होते की, भारतमातेच्या हातात तिरंगा असला पाहिजे, भगवा ध्वज नाही. त्यामुळे हा कार्यक्रम धार्मिक आहे, तसेच भित्तीपत्रकावरील भारताचे मानचित्रही मूळ स्वरूपात नाही.

२. एस्.डी.पी.आय.चे कर्नाटक राज्यातील प्रसारमाध्यम प्रमुख रियाज कदम्बू यांनी ‘ महाविद्यालयांमध्ये हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालण्याची अनुमती नसतांना पूजेला अनुमती कशी दिली जाऊ शकते?’, असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

३. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे सी.एफ्.आय.चे अध्यक्ष ताजुद्दीन यांनी म्हटले की, भारतमातेची पूजा हिंदु संस्कृतीनुसार करण्यात येणार आहे. ‘हर घर तिरंगा’च्या नावावर भारतमातेची महिमा गाणारा उत्सव का साजरा केला जात आहे ? आमची मागणी आहे की, सरकारी महाविद्यालयात भगवा ध्वज हातात घेतलेल्या भारतमातेची पूजा करण्याचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे.

संपादकीय भूमिका

हिजाब हा धार्मिक, तर भारतमाता हा राष्ट्रीय अस्मितेचा  विषय आहे. जर कुणी तिची पूजा करत असेल, तर त्यात चुकीचे काय ? जे भारतमातेलाच मानत नाहीत, तेच अशा प्रकारचा विरोध करतात ! अशांच्या विरोधाला विश्‍वविद्यालयाने बळी पडू नये !