पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य कधी मिळणार ? – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मध्यभागी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे

जम्मू (जम्मू-काश्मीर) – पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक आतंकवाद आणि फुटीरावाद यांचे बळी ठरत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पहात आहेत. त्यांना स्वातंत्र्य कधी मिळणार ? असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी केला. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

होसाबळे पुढे म्हणाले की, वर्ष १९४७ पासून पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद, फुटीरतावाद आणि युद्ध यांना प्रोत्साहन दिले जात आहे. आपले सैन्य आणि पोलीस मागील अनेक वर्षांपासून याविरोधात लढत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारतीय सैन्यासमवेत आतंकवाद आणि फुटीरतावाद यांच्याशी लढा देत आहेत. त्यांचे मी आभार मानतो.

शिवशंकर भारतात असतांना माता शारदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये कशी असू शकते ? – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कारगिल विजय दिनानिमित्त जम्मूमधील गुलशन मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कारगिल युद्धात वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘शिवरुप बाबा अमरनाथ आपल्याकडे आणि आई शारदा शक्तीस्वरुप ही नियंत्रण रेषेच्या पलीकडे (पाकव्याप्त काश्मीरमध्ये), असे कसे असू शकते ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला.