नव्या संसद भवनातील ‘अखंड भारत’च्या मानचित्राचे भारतियांकडून स्वागत !

नव्या संसद भवनाच्या एका भिंतीवर ‘अखंड भारत’ची संकल्पना दर्शवण्यात आलेले मानचित्र काढण्यात आले आहे

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. येथील भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या एक मानचित्रात ‘अखंड भारत’ची संकल्पना दर्शवण्यात आली असून हे मानचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. याचे अनेकांनी स्वागत केले आहे.

(सौजन्य : India TV)

१. अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.

२. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’चे महासंचालक अद्वैत गडनायक म्हणाले, ‘‘आमची कल्पना प्राचीन काळातील भारतीय विचारांच्या प्रभावाचे चित्रण करणे, ही होती. ते उत्तर-पश्‍चिम प्रदेशात सध्याच्या अफगाणिस्तानपासून दक्षिण-पूर्व आशियापर्यंत पसरलेले आहे.’’ संसद भवनात प्रदर्शित करावयाच्या कलाकृतींच्या निवडीत गडनायक यांचा सहभाग होता.

पाकिस्तानचा जळफळाट !

भारताच्या नव्या संसद भवनात अखंड भारताचे मानचित्र लावण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. भारत पाकिस्तानला स्वतःच्या नियंत्रणात घेण्याची भीती वाटू लागल्याची प्रतिक्रिया तेथील जनतेने व्यक्त केली आहे.

 (सौजन्य : Jansatta)

काही पत्रकारांनीही याविषयी भाष्य केले आहे. ‘भारताला पाकिस्तान कदापि देणार नाही, उलट ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) करू’ असे ते म्हणत असल्याचे वृत्तवाहिन्यांवर दिसून आले.