राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २८.१०.२०१८
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
अशा प्रकारचा निर्णय देणर्या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! ‘न्यायालयाने पुढे अशा आरोपींना दोषी ठरवून कठोरातील कठोर शिक्षा दिल्यास अन्य लोकांवर याचा वचक बसेल’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
हिंदु साधूसंतांवर अशा प्रकारचे केवळ आरोपही झाले, तरी एकजात सर्व पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी त्यांच्याविरोधात गरळओक करतात आणि सर्वच संत अन् हिंदु धर्म यांच्यावर लांच्छन लावतात. आता मात्र हा संपूर्ण चमू बिळात जाऊन लपला आहे, हे लक्षात घ्या !
मुसलमान संघटित असल्यामुळे राजकीय नेते घाबरतात, हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी प्रभावीपणे करणे अपरिहार्य !
हिंदु संतांच्या विरोधात दिवसरात्र गरळओक करणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी, तसेच हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे अशा वासनांध आणि व्यभिचारी पाद्र्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
असे अतिक्रमण करून उभारलेले चर्च उद्ध्वस्त करण्याचा आदेश न्यायालयाला द्यावा लागत असेल, तर प्रशासन हवे कशाला ?
एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.
हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्या ख्रिस्ती मिशनर्यांना वेळीच खडसवा !
एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.
हिंदु संतांवरील कथित आरोपांच्या संदर्भात सातत्याने गरळओक करणारे काँग्रेसी, निधर्मीवादी, प्रसारमाध्यमे आदी अशा पांद्य्रांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !