संत बाळूमामा देवस्थानातील ५५ लाख रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण

कोल्हापूर – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील ‘संत बाळूमामा देवस्थाना’मध्ये ५५ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशासनाने तत्कालीन धर्मादाय निरीक्षक अधिकारी रागिणी खडके आणि संबंधित कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणी अगोदरच रागिणी खडके यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! जेव्हा कोणत्याही देवस्थानावर प्रशासक नेमण्यात आले, तेव्हा प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात कोणत्या ना कोणत्या रूपात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. त्यामुळे शासनाने मंदिरे ही प्रशासकाच्या स्वाधीन न करता ती भक्तांच्या स्वाधीनच करावीत ! – संपादक)
हे ही वाचा →♦ संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा ! |
प्राथमिक माहितीनुसार देवस्थानाच्या प्रशासक कार्यकाळात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत देवस्थानाच्या निधीतून ५५ लाख रुपयांचा धनादेश कोणत्याही कायदेशीर संमतीविना नियमांचे उल्लंघन करून कंत्राटदाराला देण्यात आला. देवस्थानासाठी दान करण्यात आलेल्या विविध भूमींच्या संदर्भातही मोठा अपहार झाल्याचा आरोप आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !