मुलीने केलेल्या तक्रारीनंतर दोघांना अटक !
|

कणार्वती (गुजरात) – गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील एका चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाणार्या एका १६ वर्षीय मुलीवर तेथील पाद्य्राने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पाद्री या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असतांना त्याच्या पत्नीने या प्रसंगाचा व्हिडिओ बनवला, तसेच मुलीची अश्लील छायाचित्रेही काढली.
बलात्काराची ही घटना मे २०२१ मधील असून पोलिसांत तक्रार मात्र २८ डिसेंबर २०२१ मध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर पाद्री बळीराम कोकणी आणि त्याची पत्नी अनिता या दोघांना अटक करण्यात आली.
पोलीस तक्रारीत झालेल्या नोंदींनुसार…
१. पीडिता ही शेतात मजुरीचे काम करते. ती तिच्या आई-वडिलांसमवेत प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जात असे. एकदा पाद्री कोकणी याने मुलीला एकटीला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.
२. मुलीने पोलिसांकडे तक्रार करू नये, म्हणून पाद्री कोकणी आणि पत्नी अनिता हे तिला धमकावत असत. सामाजिक माध्यमांत तिचे व्हिडिओ प्रसारित होऊ नयेत, या भीतीपोटी तिने अनेक मास पोलिसांकडे तक्रार नोंदवली नव्हती.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !