केंद्र सरकारच्या तक्रार निवारण अपीलीय समितीचा युट्यूबला निर्देश
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांच्या लढ्याचा परिणाम !
गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका !

नवी देहली – माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या तक्रार निवारण अपीलीय समितीने यु ट्यूबर (स्वतःच्या यू ट्यूब वाहिनीद्वारे व्हिडिओ प्रसारित करणारी व्यक्ती) ध्रुव राठी याच्या हिंदु देवतांवर आधारित वादग्रस्त व्हिडिओवर बंदी घातली असून यू ट्यूबला २४ घंट्यांच्या आत तो हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या व्हिडिओमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे समितीचे मत आहे.
🚨 Dhruv Rathee's Controversial Video Faces Action
The Central Government's Grievance Appellate Committee has directed YouTube to remove Dhruv Rathee's video claiming that "Hindu deities ate meat and consumed alcohol" within 24 hours.
The order follows Advocate @SachdevaAmita's… https://t.co/g8cIduWOlt pic.twitter.com/FqzSwDaSA0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2026
१. ध्रुव राठी याचा ‘काय हिंदु गोमांस खाऊ शकतात? : केरल स्टोरी २ चा पर्दाफाश’ या शीर्षकाचा २१ मिनिटांचा व्हिडिओ २१ मार्च २०२६ या दिवशी त्याच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता. हा व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिला आणि ४ लाखांहून अधिक लोकांनी तो आवडल्याचे सांगितले.
२. ‘द केरल स्टोरी २’ या चित्रपटावर भाष्य करतांना राठी याने या व्हिडिओमध्ये हिंदूंच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर भाष्य केले. गोमांस सेवनाशी जोडलेली संवेदनशीलता बाजूला ठेवून त्याने भारतातील सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक धारणा यांवर चर्चा केली. प्राचीन ग्रंथ, शास्त्रे आणि आधुनिक सर्वेक्षण यांचा संदर्भ देत राठी याने दावा केला की, रामायण आणि महाभारत यांतील पात्रे त्यांच्या वनवासाच्या काळात हरणाच्या मांसासह इतर मांस अन् मद्य यांचे सेवन करत असत. यात त्याने प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांचे नाव घेतले.
३. या व्हिडिओच्या विरोधात अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी २२ मार्च २०२६ या दिवशी नवी देहली येथील ‘सायबर क्राईम सेल’मध्ये तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर २३ मार्च या दिवशी यूट्यूबच्या तक्रार अधिकार्याकडे रीतसर तक्रार नोंदवण्यात आली.
४. यूट्यूबने या व्हिडिओविषयी अधिक माहिती मागवली आणि पुनरावलोकन केल्यानंतर २५ मार्च रोजी ही तक्रार फेटाळून लावली. हा मजकूर स्थानिक कायद्यांचे किंवा त्यांच्या सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत नसल्याचे यूट्यूबने म्हटले. तसेच तक्रारदाराला सल्ला दिला की, जर हा व्हिडिओ भारतीय कायद्याचे उल्लंघन करतो, असे वाटत असेल, तर त्यांनी तो ‘ब्लॉक’ करावा किंवा न्यायालयाचे साहाय्य घ्यावे.
५. यानंतर अधिवक्त्या सचदेवा यांनी २७ मार्च २०२६ या दिवशी तक्रार निवारण अपीलीय समितीकडे अपील प्रविष्ट केले. २ मासांपेक्षा अधिक काळ हे अपील प्रलंबित राहिले. त्यानंतर त्यांनी रिट याचिकेद्वारे देहली उच्च न्यायालयात धाव घेतली. ३ जुलै २०२६ या दिवशी न्यायालयाने अपीलीय प्राधिकरणाला या प्रकरणावर जलद निर्णय घेण्याचे, तसेच आदेशाची प्रत १५ दिवसांच्या आत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.
६. समितीने धार्मिक भावनांशी जोडलेल्या प्रकरणांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा युक्तीवाद फेटाळून लावत यूट्यूबला व्हिडिओ हटवण्यास सांगितले. समितीचे म्हणणे आहे की, या व्हिडिओच्या पडताळणीवरून असे दिसून येते की, यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, जे संपूर्ण समाजासाठीही चांगले संकेत नाहीत.
७. राठीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी अधिवक्त्या सचदेवा यांनी साकेतच्या दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली असून ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. याची पुढील सुनावणी १० सप्टेंबर २०२६ या दिवशी होणार आहे.
🚨 BREAKING: Government of India Orders Immediate Takedown of Dhruv Rathee’s (@dhruv_rathee) Video.
The Grievance Appellate Committee (GAC), Ministry of Electronics & IT, Government of India, has passed an Order dated 15 July 2026 (Appeal No. 8321/2026) directing YouTube to… pic.twitter.com/hP4rpGmLVC
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) July 19, 2026
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
अशा प्रकरणांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा ! – अधिवक्त्या अमिता सचदेवाअधिवक्त्या सचदेवा यांनी सामाजिक माध्यमांवर हा आदेश प्रसारित करत याला योग्य दिशेने उचललेले पाऊल म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, निर्मितीच्या नावाखाली श्रद्धेची चेष्टा केली जाऊ शकत नाही. न्याय टप्प्याटप्प्याने मिळत आहे. वास्तविक अशा प्रकरणांचा निपटारा तातडीने व्हायला हवा; कारण जोपर्यंत यावर चर्चा होते, तोपर्यंत लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि याच्या निर्मात्यांनाही ‘वादग्रस्त व्हिडिओ बनवा आणि अधिकाधिक दर्शक मिळवा’, नेमके हेच हवे असते. |
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त