लैैंंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रांविरुद्ध कारवाई करण्यास कटीबद्ध !

  • माजी पोप बेनेडिक्ट यांनी पाद्य्रांवर कारवाई न केल्याच्या त्यांच्यावरील आरोपानंतर सध्याचे पोप फ्रान्सिस यांचा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न ! – संपादक
  • पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात किती वासनांध पाद्य्रांवर कारवाई केली, हे त्यांनी घोषित केले पाहिजे अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’, असेच जगाला वाटेल ! – संपादक
पोप फ्रान्सिस

रोम (इटली) – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पाद्य्रांकडून करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी पीडितांना न्याय देण्याविषयी कटीबद्ध असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जर्मनीतील एका विधी आस्थापनाने माजी पोप बेनेडिक्ट यांनी लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील पाद्य्रांवर कारवाई न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी ते दोषी पाद्य्रांवर कारवाई करण्यास कटीबद्ध असल्याचे घोषित केले आहे, तसेच लैंगिक शोषणांच्या प्रकरणांची चौकशी चालू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.