नवी देहली – जंतरमंतर येथे गेल्या २३ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या ३ कार्यकर्त्यांनी त्यांचे उपोषण २३ दिवसानंतर मागे घेतले. विरोधी पक्षांचे खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्या शिष्टमंडळाने उपोषण सोडण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. नेहा, मनीष आणि आमीन या तिघांनी उपोषण सोडले. शिष्टमंडळाने ‘विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडल्या जातील आणि राजकीय तसेच जनआंदोलन यांच्या माध्यमातून त्यासाठी लढा चालू ठेवला जाईल’, असे आश्वासन दिले.
या संघटनेने आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देशभर महिनाभराचे आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, ‘राष्ट्रीय परीक्षा संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ यांच्या विरोधात हे अभियान राबवले जाणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविषयी दायित्व निश्चित करण्याची मागणीही कायम ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त