रेल्वे तिकिटांच्या दलालीचे प्रकरण
माहितीच्या अधिकारातून माहिती उघड

मुंबई – ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ अंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई येथील रेल्वे सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२२ ते जून २०२६ या कालावधीत रेल्वे तिकिटांच्या अवैध दलाली (टाऊटिंग) संदर्भात १ सहस्र ६७६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात कोट्यवधी रुपयांची ई-तिकिटे आणि अन्य तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. शेकडो मध्यस्थ आणि दलाल यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.
🚨 Railway Ticket Black Market Thrives!
Over the past 5 years, 1,676 cases of railway ticket black-marketing have been registered, with tickets worth crores of rupees seized. The figures came to light through an RTI.
Black-marketing will end only when offenders face strict… pic.twitter.com/WJ0wbtvuoH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2026
१. अवैध तिकीट बुकिंग आणि दलाली यांच्या प्रकरणी वर्ष २०२२ मध्ये ३१८ मध्यस्थ आणि ५२ दलाल, वर्ष २०२३ मध्ये ३५६ मध्यस्थ आणि १४१ दलाल, वर्ष २०२४ मध्ये ४११ मध्यस्थ आणि २०४ दलाल, २०२५ मध्ये ४२९ मध्यस्थ आणि १३ दलाल, तर जुलै २०२६ पर्यंत १२७ मध्यस्थांना अटक करण्यात आली. वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत कोणत्याही दलालाला अटक झालेली नाही.
२. या कालावधीत काही रेल्वे कर्मचार्यांवरही कारवाई करण्यात आली. वर्ष २०२२ मध्ये १, २०२३ मध्ये २ आणि २०२४ मध्ये ४ रेल्वे कर्मचार्यांना अटक करण्यात आली; मात्र वर्ष २०२५ आणि २०२६ मध्ये कोणत्याही रेल्वे कर्मचार्याला अटक झालेली नाही.
३. अनिल गलगली यांनी सांगितले की, प्राप्त माहितीवरून रेल्वे तिकिटांच्या अवैध दलालीच्या विरोधात रेल्वे सुरक्षा दल सातत्याने प्रभावी कारवाई करत असल्याचे स्पष्ट होते. प्रवाशांनी तिकिटे केवळ अधिकृत माध्यमांतूनच खरेदी करावीत. दलालांकडून तिकिटे घेणे टाळावे. त्यातूनच अवैध व्यवसायावर अधिक प्रभावीपणे आळा घालता येईल.
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !