संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित

नवी देहली – संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैला सकाळी प्रारंभ होताच विरोधकांनी ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटणे, तसेच श्रीराममंदिरातील दान चोरी यांसारख्या सूत्रांवरून जोरदार गदारोळ केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत स्थगित केले होते; परंतु कामकाज पुन्हा चालू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ केल्याने ते साडेबारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

राज्यसभेतही हीच स्थिती राहिल्याने ते सभागृहही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

संपादकीय भूमिका

संसदेचे कामकाज गदारोळामुळे स्थगित करण्यासाठी उत्तरदायी असणार्‍यांचे सदस्यत्व रहित करण्यासह त्यांच्याकडून कामकाजासाठी होणारा खर्च वसूल केला पाहिजे !