
कीव्ह (युक्रेन) – रशियाने काळ्या समुद्रातील भारतीय खलाशी असलेल्या मालवाहू नौकेवर क्षेपणास्त्रांद्वारे केलेल्या आक्रमणात नौकेतील ६ जण ठार झाले.
ओडेसा बंदराजवळ तुर्कीयेच्या मालकीच्या आणि गिनी-बिसाऊचा ध्वज असलेल्या ‘गोल्डन लिओ’ या नौकेवर रशियाने सलग ३ क्षेपणास्त्रे डागली. या नौकेत भारत आणि सीरिया यांचे एकूण १७ खलाशी अन् १ युक्रेनियन कॅप्टन कार्यरत होता. या आक्रमणात कॅप्टन, तसेच अन्य ५ जण यांचा मृत्यू झाला आहे. ४ जण बेपत्ता असून ८ जणांची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्या खलांशांपैकी २ खलाशी घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह खारकीव्ह, झापोरिझिया आणि सुमी या शहरांवरही क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांद्वारे आक्रमणे केली. या आक्रमणांत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. नागरी भाग, गोदामे आणि अन्य मालमत्ता यांची मोठी हानी झाली. यावर युक्रेनने रशियाच्या नौकांवर आक्रमण केले. त्यास प्रत्युत्तर देत रशियाने युक्रेनशी संबंधित काळ्या समुद्रातील नौकांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin