हिंदु संतांच्या विरोधात दिवसरात्र गरळओक करणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी, तसेच हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे अशा वासनांध आणि व्यभिचारी पाद्र्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
मुंबई – अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी गोवंडीमधील शिवाजीनगर येथील ‘क्रिस्ट द किंग’ या चर्चचे पाद्री लॉरेन्स जॉन्सन (वय ५६ वर्षे) याच्या विरोधात पोलिसांनी विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयात नुकतेच आरोपपत्र प्रविष्ट केले. फादर लॉरेन्स जॉन्सन याने वर्ष २०१५ मध्ये चर्चमध्ये आलेल्या एका १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले. (आरोपपत्र प्रविष्ट करायला ६ वर्षे घेणारी सुस्त पोलीस यंत्रणा ! अशांचा समाजाला कधी आधार वाटेल का ? – संपादक)
१. २७ नोव्हेंबर २०१५ ला रात्री ८ वाजता अल्पवयीन मुलगा कुटुंबियांसह शिवाजीनगर येथील ‘द किंग चर्च’मध्ये गेला होता. चर्चमधील प्रार्थना संपल्यावर मुलाचे कुटुंबीय घरी निघून जात असतांना पाद्री लॉरेन्स जॉन्सन याने अल्पवयीन मुलाला काही साहित्य उचलून खोलीत ठेवण्यास सांगितले.
२. मुलगा साहित्य ठेवत असतांना पाद्री लॉरेन्स जॉन्सन याने आतून दरवाजा बंद करून त्याचे लैंगिक शोषण केले. मुलगा घरी आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्यावर पालकांनी केलेल्या चौकशीत पाद्री लॉरेन्स जॉन्सन याने मुलाशी केलेला अपप्रकार उघडकीस आला.
३. पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी फादर लॉरेन्स जॉन्सन याच्या विरोधात बाल अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉक्सो) आणि अन्य कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.