यवतमाळ जिल्हा कारागृहातील बंदीवानाकडून पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक आक्रमण

कारागृहात असतांनाही प्राणघातक आक्रमण करण्याचे बंदीवानांचे धाडस होते, याचा अर्थ त्यांना कारागृहातील शिक्षेचा काही धाकच राहिलेला नाही ! जरब बसेल, अशी शिक्षा त्यांना देणे अपेक्षित !

यवतमाळ, २ डिसेंबर (वार्ता.) – शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृह वर्ग १ येथे १ डिसेंबर या दिवशी सकाळी कारागृह अधीक्षक (श्रेणी २) प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन बंदीवानांची पडताळणी करत होते. तेव्हा त्यांच्यावर राहुल उपाख्य सिन्नू शिंदे या बंदीवानाने दाढी करण्याच्या कारणावरून प्राणघातक आक्रमण केले. या वेळी इतर कर्मचारी आले. तरीही कारागृहातील काही बंदीवानांनी सर्व बंदीवानांना ओरडण्यास उद्युक्त करून शांतता भंग केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.