देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे लज्जास्पद !

देहली येथील कैलाश विहार पंसारी भागात शिवशक्ती मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मंदिरातील १२ हून अधिक मूर्ती तोडण्यात आल्या. या मूर्तींचे शिर तोडण्यात आले आहे. २४.११.२०२० च्या रात्री मंदिराचे दार बंद करण्याचे राहिल्याने ही घटना घडली. (दार बंद करायचे राहिले कि मुद्दामहून बंद केले नाही, याचीही चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)