शिक्रापूर – मुळशी आणि भोसरी परिसरातून चोरून आणलेला अनुमाने २६ लाख रुपयांचा चंदनाचा साठा घेऊन नगर येथे निघालेल्या चंदन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने १ डिसेंबरच्या मध्यरात्री शिक्रापूर येथे पकडले आहे. मूळ चंदनचोर तस्कर आणि व्यापारी यांच्या साखळीपर्यंत पोलीस आता लवकरच पोचणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.