विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक ! – प्रशासनाचा निर्णय

निपाणी (जिल्हा बेळगाव) – कोरोनामुळे शासनाने विवाह समारंभासाठी ५० जणच उपस्थित राहू शकतील, अशी अट घातली आहे. येत्या जानेवारी, फेब्रुवारी मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. मास्क वापरला नाही, तर कार्यालयच बंद करण्याची चेतावणी प्रशासनाने दिली आहे. विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे. विनाअनुमती विवाह केल्यास थेट गुन्हे नोंद केले जाणार आहेत. १ डिसेंबरपासून हे आदेश लागू असून खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रम यांसाठी बंदी कायम ठेवली आहे. विवाह सोहळ्यांना फटाके आणि वाजंत्री यांना अनुमती दिलेली नाही.

या सदंर्भात निपाणी येथील तहसीलदार प्रकाश गायकवाड म्हणाले, नियम आणि अटी पाळून विवाह सोहळ्यांना अनुमती मिळेल. पालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे संबंधित कुटुंब प्रमुखांनी अनुमती घेणे आवश्यक आहे. अनुमती न घेतल्यास कारवाई करण्यात येईल.