शिकारीसाठी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणारे १६ जण पोलिसांच्या कह्यात

एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्‍वास कसा ठेवायचा ?

कुडाळ – तालुक्यातील मौजे बाब, तिरांबीवाडी येथे शिकारीसाठी शस्त्रे घेऊन फिरत असलेल्या १६ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कह्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून ६ बंदुका, ७ काडतुसे, ५ दुचाकी आणि १ रिक्शा, असे एकूण ४ लाख ३६ सहस्र रुपयांचे साहित्य कह्यात घेण्यात आले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनवडे यांनी दिली.