
सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला. यामध्ये एक युवती चारचाकीतून बाहेर फेकली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी १५० ते २०० फूट दरीत कोसळली; मात्र चारचाकीमधील २ युवक केवळ घायाळ झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोचले. त्यांनी शिवेंद्रराजे ट्रेकर्स ग्रूपला ही माहिती कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घायाळ युवक आणि मृत युवतीला दरीतून वर काढले.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी