सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते.

सात्त्विक नक्षी असलेले अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ! – पू. (सौ.) भावना शिंदे

धातूंमध्ये ‘सुवर्ण’ हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक धातू जरी असला, तरी या धातूपासून बनवलेल्या अलंकारांची नक्षी सात्त्विक नसल्यास त्यापासून अलंकार परिधान करणार्‍याला अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळू शकत नाही. अलंकार कसा बनवला आहे, यावर त्यातून सात्त्विक, राजसिक कि तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतील, हे ठरते.

सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारे सोन्याचे अलंकार !

सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.

सोन्याच्या अलंकारांमुळे होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावरील लाभ जाणा !

विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्‍वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन व्यक्तींची सात्त्विकता वाढते.

देवतांचे चैतन्य ग्रहण करून देणारे अलंकार !

अलंकार म्हणजे ईश्‍वरी तत्त्व ग्रहण करून जिवाला त्याचा लाभ करून देणारा प्रणेता.

दिवाळीतील श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीदेवीला अलंकार परिधान करतांना म्हणावयाचा श्‍लोक !

रत्नकंकणकेयूरकांचीकुण्डलनूपुरम् । मुक्ताहारं किरीटं च गृहाणाभरणानिमे ॥

‘साधना’ हाच मानवाचा खरा अलंकार !

जिवाने ईश्‍वरनिर्मित धर्माचे आचरण आणि तंतोतंत पालन करणे, म्हणजेच जिवाने त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त अशी साधना करून मिळालेल्या अमूल्य अशा मनुष्यजन्माचे सार्थक करणे.

ईश्‍वरी गुण आणि अवगुण तसेच अलंकार !

ईश्‍वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्‍वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्‍वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो.

अंगठी अनामिकेत का घालावी ?

अंगठी प्रवाहीपणाचे प्राबल्य दर्शवणार्‍या आपतत्त्वाचे दर्शक असलेल्या अनामिकेत घातली जाते; कारण जिवाचा देहसुद्धा पृथ्वी आणि आप तत्त्वाच्या प्राबल्याने बनलेला असल्याने जिवाला अंगठीच्या प्रवाहीपणाच्या स्तरावर लाभ मिळू शकतो.