सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारे सोन्याचे अलंकार !

सुवर्ण धातूचे महत्त्व

  • ‘सुवर्ण हे शरिरातील प्रतिकूल कीटाणूंचा नाश करते. – ब्राह्मणग्रंथ’
  •  सर्व धातूंमध्ये सोने हा सर्वांत सात्त्विक धातू आहे.
  • सोने हा सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करणारा धातू : ‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’ यामुळे सोन्याचे अलंकार परिधान करणार्‍या व्यक्तीला सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.’ – एक विद्वान (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करतात. (१०.१०.२००५)

सोन्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होते !

‘अलंकार सोन्याचे असल्याने, तसेच सोने हा धातू तेजोमय, म्हणजेच तेजतत्त्व प्रदान करणारा असल्याने या धातूतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीच्या शरिरातील सूर्यनाडी कार्यरत होऊन तिच्या आधारे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होऊन संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते.’ – एक विद्वान (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करतात.) (१७.१२.२००५)

‘सोन्याच्या अलंकारांमुळे व्यक्तीला जास्त प्रमाणात ईश्‍वरी ऊर्जा ग्रहण करणे शक्य होते.’ – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००७, रात्री ८.०५)


सोन्याच्या वस्तूकडे बघितल्यावर आध्यात्मिक उपाय होणे आणि डोक्यावर शीतलता अन् जिभेवर चांगल्या संवेदना जाणवणे

‘२४.१०.२००६ या दिवशी सोन्याच्या वस्तूकडे बघितल्यावर मला खोकला आला, तसेच ढेकरा आणि जांभयाही येऊ लागल्या. (सोन्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे आध्यात्मिक उपाय होऊन शरिरातील काळी शक्ती खोकला, ढेकरा आणि जांभया यांच्या माध्यमातून बाहेर पडली. – संपादक) ‘सोन्याच्या वस्तूतून सात्त्विक आणि चैतन्यमय किरण बाहेर पडून त्यांचा माझ्या शरिराला स्पर्श होऊन तेथील काळी शक्ती न्यून झाली’, असे मला जाणवले.

थोड्या वेळाने मला डोक्यावर शीतलता आणि जिभेवर चांगल्या संवेदना जाणवल्या. माझा श्‍वास एका लयीत होऊ लागला. नाकातील काळी शक्ती न्यून झाल्याने नाक मोकळे झाले. माझे डोके आणि पाठ यांवर मला चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. मला शांत आणि स्थिर वाटू लागले.

– कु. रजनी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


वाईट शक्तींवर होणारा सोन्याच्या अलंकारांचा परिणाम

सोन्याचे अलंकार तेजाशी संबंधित चैतन्य उत्तम प्रकारे ग्रहण आणि प्रक्षेपित करू शकत असल्याने या चैतन्याचा परिणाम होऊ नये, म्हणून वाईट शक्तींनी आधीच साधिकांनी घातलेले सोन्याचे अलंकार काढून टाकणे : ‘१६.११.२००६ या दिवशी साधिकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींवर भारतीय आणि पाश्‍चात्त्य संगीत यांचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात नादाचे विविध प्रयोग केले. त्या वेळी वाईट शक्तींनी प्रयोग चालू होण्यापूर्वीच साधिकांच्या अंगावरील सोन्याचे अलंकार काढून टाकले. अलंकार काढून टाकण्यामागे पुढील कारण असल्याचे लक्षात आले.

तेजतत्त्वाशी संबंधित सोन्याचे अलंकार तेजाशी संबंधित चैतन्य उत्तम प्रकारे ग्रहण आणि प्रक्षेपित करू शकत असल्याने या चैतन्याचा परिणाम होऊ नये, यासाठी वाईट शक्तींनी सतर्कता म्हणून आधीच अलंकार काढून टाकले. नादातील गतीमान तेजतत्त्वामुळे अलंकारांतील तेजतत्त्व कार्यरत होऊन त्यात साठवलेल्या काळ्या शक्तीचे विघटन करून देहावरही परिणाम करते; म्हणून शक्यतो वाईट शक्ती अलंकारांचा देहाला होणारा स्पर्श टाळतात.

  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक