सोन्याच्या अलंकारांमुळे होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावरील लाभ जाणा !

नकळतपणे बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) उपायांचा लाभ करवून देणारे अलंकारांचे सामर्थ्य !

अलंकार परिधान केल्याने शरिराच्या त्या त्या भागातील बिंदू दाबले जाऊन बिंदूदाबनाचे (अ‍ॅक्युप्रेशरचे) उपाय होतात. यावरून पूर्वापार चालत आलेला अलंकार परिधान करण्याचा उद्देश हा किती आध्यात्मिक स्तरावर बिंदूदाबन पद्धतीतून नकळतच सातत्याने कार्य करणारा आहे, हे लक्षात येते. पूर्वीचे जीव अलंकार परिधान करत असल्याने त्यांना बिंदूदाबनाची आवश्यकता भासली नाही. कलियुगात हिंदू आचारधर्मापासून दूर गेल्याने या पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली. पूर्वी बिंदूदाबनाची पद्धत वापरली जाऊन तिचा आचारधर्माच्या योगे चैतन्याच्या स्तरावर वापर करून घेण्यात आपले वैदिकजन अग्रेसर ठरलेले होते, हेच यातून सिद्ध होते.’

– एक विद्वान (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करतात.) (२२.१०.२००७)

सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी, तसेच शुभदिनी नवीन किंवा रेशमी वस्त्रे अन् विविध अलंकार परिधान केल्याने वाईट शक्तींपासून रक्षण होणे

यज्ञ, मुंज, विवाह, वास्तूशांत यांसारखे धार्मिक विधी या वेळी देवता आणि आसुरी शक्ती यांचे सूक्ष्म-युद्ध अनुक्रमे ब्रह्मांड, वायूमंडल अन् वास्तू येथे होत असते. त्यामुळे सण साजरा करणार्‍या आणि धार्मिक विधींच्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या व्यक्ती यांच्यावर सूक्ष्म-युद्धाचा परिणाम होऊन त्यांना वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो. विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्‍वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन व्यक्तींची सात्त्विकता वाढते आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून त्यांचे संरक्षण होते. यासाठी सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी, तसेच शुभदिनी नवीन किंवा रेशमी वस्त्रे आणि विविध अलंकार परिधान करण्याविषयी धर्मशास्त्रात सांगितले आहे.’

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.