अंगठी अनामिकेत का घालावी ?

१. अंगठी अनामिकेत घातल्यावर चैतन्य ग्रहण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

२. अंगठी प्रवाहीपणाचे प्राबल्य दर्शवणार्‍या आपतत्त्वाचे दर्शक असलेल्या अनामिकेत घातली जाते; कारण जिवाचा देहसुद्धा पृथ्वी आणि आप तत्त्वाच्या प्राबल्याने बनलेला असल्याने जिवाला अंगठीच्या प्रवाहीपणाच्या स्तरावर लाभ मिळू शकतो.

३. आपतत्त्वाच्या प्रक्षेपणाचे आणि संवर्धनाचे प्रतीक असलेल्या अनामिकेत सोन्या-चांदीपासून बनवलेल्या अंगठ्या घालणे श्रेयस्कर आहे.

– ‘एक विद्वान’ (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३१.१२.२००७)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.