पुणे – राज्यामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेले बीए ४ आणि बीए ५ चे रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. या प्रकारचे ७ रुग्ण पुण्यामध्ये सापडले आहेत. पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने चालू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ही माहिती दिली आहे.
सावधान! नवे टेन्शन!! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव, पुण्यात 7 रुग्ण सापडल्याने खळबळ
सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक कराhttps://t.co/Ykag35tCNA pic.twitter.com/ipiZ8GcXkV
— Saamana (@SaamanaOnline) May 29, 2022
‘कोरोना कृती दला’चे सदस्य आधुनिक वैद्य राहुल पंडित म्हणाले, ‘‘ओमिक्रॉन प्रकारातील या विषाणूचा सध्या तरी फारसा धोका नाही. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या तुलनेत हा वेग अल्प आहे. पुढील काही दिवस रुग्णसंख्येत वाढ होत राहील; परंतु रुग्णालयात भरती रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण अल्प राहिल्यास चिंतेचे कारण नाही. या दृष्टीने या दोन्ही गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.’’