आफ्रिकेतून ८७ जण मुंबईत; दोघे कोरोना ‘पॉझिटिव्ह’
या दोघांमध्ये ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ची लक्षणे आहेत कि नाहीत, याची तपासणी बाकी आहे.
या दोघांमध्ये ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ची लक्षणे आहेत कि नाहीत, याची तपासणी बाकी आहे.
राज्य सरकारने ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.
प्रत्येक कोविड केंद्राचे लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी मुखपट्टीचा वापर न करणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवसाला २५ सहस्र जणांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘देशभरातील आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील प्रवासी यांना शोधणे सोपे जाईल’, असे मत व्यक्त केले.
भारताने १२ देशांतून येणार्या प्रवाशांना विमानतळांवर चाचणी करणे बंधनकारक केले आहे, तर अमेरिकेने दक्षिण आफ्रिका खंडातून येणार्या ८ देशांतील प्रवाशांना बंदी घालण्याची सिद्धता केली आहे.