६० वर्षीय वृद्धेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह लोकांना न्यायही मिळत नाही, हे पहाता तेथे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य !

बिहारमध्ये चिराग पासवान यांच्याविरुद्ध लोकजनशक्ती पक्षाच्या पाचही खासदारांचे बंड !

भारतीय राजकारणातील तत्त्वहीनता ! पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे लोकप्रतिनिधी कधी जनतेशी एकनिष्ठ रहातील का ?

समाजाची दिशाभूल करण्यासाठी राजकीय द्वेषातून आरोप ! – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने मंदिरासाठी न्यूनतम मूल्याने भूमी खरेदी केली आहे. काही राजकीय पक्षांचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत.

हातात तलवार घेऊन फिरणार्‍या राय डिसूजा या मनोरुग्णाचा पोलीस मारहाणीत मृत्यू !

या प्रकरणी ८ पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दक्षिण विभागाचे पोलीस अधिकारी प्रवीण मधुकर पवार यांनी दिला.

रामायणावर आधारित चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (खान) यांनी सीतामातेची भूमिका साकारण्याला सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विरोध !

हिंदु धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी करीना कपूर (खान) यांच्या सीतामातेच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात विरोध होणे कौतुकास्पद ! जोपर्यंत सीतामातेच्या भूमिकेसाठी हिंदु अभिनेत्रीचे नाव घोषित केले जात नाही, तोपर्यंत समस्त हिंदूंनी हा लढा चालूच ठेवावा !

कवळे (फोंडा) येथील श्री शांतादुर्गा संस्थानच्या नावाने उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथे बनावट संकेतस्थळ आणि अधिकोषात खाते उघडून पैसे उकळल्याचे उघड

श्री शांतादुर्गा देवस्थानने महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे देणग्या स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेले नाही.

उडुपी (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून शेजारील हिंदूच्या गायीची चोरी करून हत्या !

शेजारी कोणत्या मानसिकतेचे लोक रहातात आणि भविष्यात ते जिवालाही धोका निर्माण करू शकतात, याचा विचार करून हिंदूंनी स्वरक्षणासाठी नेहमीच सिद्ध रहायला हवे, हेच ही घटना दर्शवते !

‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

पनवेल (रायगड) येथील धर्मप्रेमी श्री. गिरीश ढवळीकर यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे आवाहन !

ज्या डॉक्टरांनी अंतिम परीक्षाच दिलेली नाही, त्यांच्याकडे रुग्णांचे दायित्व कसे सोपवता येईल ? – सर्वोच्च न्यायालय

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय (पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल) अंतिम परीक्षा रहित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आम्ही परीक्षा रहित करण्याचा आदेश देऊ शकत नाही; कारण हे शैक्षणिक धोरणाचे प्रकरण आहे.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ लिहा ! – प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

शंकराचार्य परिषदेकडून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी महाअभियान प्रारंभ