रामायणावर आधारित चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (खान) यांनी सीतामातेची भूमिका साकारण्याला सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विरोध !

‘ट्विटर’वर ‘#BoycottKareenaKhan ट्रेंड’ राबवून नेटकर्‍यांकडून संताप व्यक्त सनातन संस्कृतीचा अभिमान असलेल्या अभिनेत्रीला भूमिका द्या ! – टीकाकारांची मागणी

हिंदु धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी करीना कपूर (खान) यांच्या सीतामातेच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात विरोध होणे कौतुकास्पद ! जोपर्यंत सीतामातेच्या भूमिकेसाठी हिंदु अभिनेत्रीचे नाव घोषित केले जात नाही, तोपर्यंत समस्त हिंदूंनी हा लढा चालूच ठेवावा !

मुंबई – लेखक विजेंद्र प्रसाद यांच्या ‘रामायणा’वर आधारित चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (खान) यांनी सीतामातेच्या भूमिका साकारण्यावर सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येत आहे. ‘सीतामातेची भूमिका साकारण्यास करीना कपूर पात्र नाहीत. सनातन संस्कृतीचा अभिमान असलेल्या अभिनेत्रीने सीतामातेची भूमिका साकारावी’, अशी मते टीकाकारांनी व्यक्त केली आहेत. याविषयी १२ जून या दिवशी ‘ट्विटर’वर राबवण्यात आलेला ‘#BoycottKareenaKhan’ हा ‘ट्रेंड’ देशात पहिल्या क्रमांकावर राहिला.

१. रामायणावर प्रस्तावित असलेल्या या चित्रपटात करीना कपूर या सीतामातेच्या भूमिका साकारणार असून त्यासाठी त्यांनी १२ कोटी रुपये इतक्या मानधनाची मागणी केल्याचे वृत्त काही माध्यमांवर प्रसारित झाले होते.

२. या वृत्तानंतर सामाजिक माध्यमांद्वारे याला विरोध दर्शवण्यात आला. यामध्ये काहींनी करीना कपूर यांचे सिगारेट ओढतांनाचे छायाचित्र प्रसारित केले, तर काहींनी ‘करीना कपूर यांच्यामध्ये सीतामातेचे कोणते गुण आहेत ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला. काहींनी खान कुटुंबियांनी आतापर्यंत हिंदूंच्या भावनांचा अनादर केल्याचे म्हटले आहे, तर काही जणांनी ‘करीना कपूर यांनी सीतामातेची भूमिका साकारल्यास चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे.

३. या सर्व प्रकारानंतर चित्रपटाचे लेखक विजेंद्र प्रसाद यांनी ‘अद्याप करीना कपूर यांना सीतेच्या भूमिकेसाठी अंतिम करण्यात आलेले नाही’, असे स्पष्ट केले आहे.