६० वर्षीय वृद्धेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार

  • बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतरचा हिंसाचार !

  • वृद्धेची सर्वोच्च न्यायालयात अन्वेषण करण्यासाठी याचिका !

  • तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून न घेणार्‍या पोलिसांनाच अटक करून त्यांना आजन्म कारागृहात टाका !
  • बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह लोकांना न्यायही मिळत नाही, हे पहाता तेथे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य !
  • महिला मुख्यमंत्री असतांनाही बंगालमध्ये अशी स्थिती असेल, तर महिलांचे रक्षण कोण करणार ?

नवी देहली – बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या वेळी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर तिच्या ६ वर्षीय नातवासमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या वेळी पोलिसांत तक्रार करूनही आरोपींच्या विरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने या महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे.
या वृद्ध महिलेने न्यायालयाला सांगितले की, पूर्व मेदिनीपूर येथे निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी लुटमार केली. तसेच मला खाटेला बांधून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर मी बेशुद्ध झाल्याने शेजारी लोकांनी मला रुग्णालयात भरती केले. या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला.

१७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

बंगालच्याच एका १७ वर्षीय मुलीने तिच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करत विशेष अन्वेषण पथक स्थापन करून किंवा सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या गुन्ह्याचा खटला बंगाल बाहेर चालवण्याची मागणीही तिने केली आहे.