देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये अहिंदू अन् अश्रद्ध यांना प्रवेशबंदी करा ! – हिंदु जनजागृती समितीचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन

अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांविषयी घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता ! अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत !

सासाराम (बिहार) येथे कोरोनामुळे कोचिंग सेटर बंद केल्याने विद्यार्थ्यांकडून तोडफोड आणि जाळपोळ

नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?

चेन्नई सुपरकिंग्जच्या टी शर्टवरील मद्य आस्थापनाचा लोगो हटवण्याची क्रिकेटपटू मोईन अली यांची मागणी मान्य

मुसलमान त्यांच्या धर्माचे कठोरपणे पालन करतात. अशांकडून हिंदू काही शिकतील का ?

हरिद्वार येथील सप्तसरोवर मार्गावर पेशवाईंचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !

या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्‍वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्‍वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्‍वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.

भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र विधीला ‘पेटंट’ !

भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. प्रत्येकाने येणार्‍या आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त असा अग्निहोत्र विधी शिकणे आवश्यक !

गीता प्रेस ट्रस्टचे अध्यक्ष आणि ‘कल्याण’ नियतकालिकाचे संपादक राधेश्याम खेमका यांचे निधन 

गीता प्रेस ट्रस्टचे अध्यक्ष आणि ‘कल्याण’ या नियतकालिकाचे संपादक राधेश्याम खेमका यांचे वाराणसी येथे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. खेमका यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दू भाषांतर करून सरकारी संस्थेकडून प्रकाशन

डॉ. मोहन भागवत यांच्या ‘भविष्य का भारत’ या पुस्तकाचे उर्दूमध्ये ‘मुस्तकबिल का भारत’ या नावाने भाषांतर केले आहे.

विदेशी ‘ऑनलाईन’ खेळांना पर्याय म्हणून भारतीय संस्कारी खेळ निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न !

भारतात खेळल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ खेळांमधील ९८ टक्के खेळ विदेशीच असतात. आता यात पालट करण्याच्या सिद्धतेत केंद्र सरकार असून तसे झाले, तर दुर्गादेवी, काली माता, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीच्या राणी यांच्यावर आधारित देशी खेळ मुलांना खेळण्यास मिळू शकतात.

चहा बनवून न दिल्याने रईसुद्दीनकडून पत्नी शबनम हिला तलाक

तलाकच्या विरोधात कायदा करण्यात आल्यानंतरही अशा घटना चालू आहेत. याचा अर्थ धर्मांधांना शिक्षेची भीती वाटत नाही, असेच म्हणावे लागेल ! त्यामुळे आता अधिक कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने यात पालट केला पाहिजे !

अयोध्येतील ५ एकर भूमीवर मशिदीसाठी आतापर्यंत केवळ २० लाख रुपयांचीच देणगी गोळा !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी हिंदूंना देण्यात येतांना मुसलमानांना ५ एकर भूमी देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार अयोध्येतील धन्नीपूरमध्ये ५ एकर जागा देण्यात आली. येथे सध्या मशीद बांधण्यात येत आहे.