हातात तलवार घेऊन फिरणार्‍या राय डिसूजा या मनोरुग्णाचा पोलीस मारहाणीत मृत्यू !

८ पोलीस निलंबित !

अशा पोलिसांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

प्रतिकात्मक छायाचित्र

मडिकेरी (कर्नाटक) – कोडगु जिल्ह्यातील विराजपेटे येथे पोलिसांच्या मारहाणीत राय डिसूजा (वय ५० वर्षे) या मनोरुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ८ पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दक्षिण विभागाचे पोलीस अधिकारी प्रवीण मधुकर पवार यांनी दिला.

९ जूनला रात्री राय डिसूजा हे हातात तलवार घेऊन रस्त्यात फिरत होते. यावर पोलिसांनी त्यांना कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे घायाळ झालेल्या राय यांचा १२ जूनला मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राय यांचे कुटुंबीय, ख्रिस्ती संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे नेते यांनी तीव्र निषेध केला असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचे अन्वेषण राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे.