लावण्याला न्याय मिळावा, यासाठी ‘अभाविप’कडून ‘रस्ता बंद’ आंदोलन !

‘लावण्या’ ख्रिस्ती होत नसल्यामुळे मागील २ वर्षांपासून शाळेतील ख्रिस्ती शिक्षिका तिला शौचालय स्वच्छ करणे, झाडू मारणे, भांडी धुवायला लावणे अशी कामे करायला सांगून तिचा मानसिक छळ करत होत्या. या त्रासाला कंटाळून लावण्या हिने विषप्राशन करून आत्महत्या केली.

(म्हणे) ‘भाजपने साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देऊन उमेदवारी दिली !’ – सचिन सावंत, काँग्रेस

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुभांड रचल्याचा जबाब या खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात दिला आहे

पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अधिवक्ता आशुतोष दुबे यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार !

कर्नाटकमध्ये महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याला विरोध दर्शवणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हटल्याचे प्रकरण

‘ईडी’च्या चौकशीला घाबरून नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ! – विनायक राऊत, खासदार, शिवसेना

नारायण राणे यांची पंतप्रधान मोदी यांवरील टीका आणि किरीट सोमय्या यांचे राणे यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ केले पत्रकार परिषदेत सादर ! 

३ ते २५ मार्च या कालावधीत होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन !

महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष २०२२ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे ३ मार्चपासून चालू होणार आहे. २५ मार्चपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू रहाणार आहे.

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

आजवर कुणीही हिंदूंना आतंकवादी म्हटले नाही; मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादींनी भगवा आतंकवाद अन् हिंदु आतंकवादी असे लेबल लावले. आता ते सर्वजण देश आणि हिंदुविरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.

विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेने १० मासांत ८० कोटी रुपये वसूल केले !

एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत आरक्षित रेल्वे तिकीटांचे बेकायदेशीर हस्तांतराचे ९ गुन्हे नोंद करण्यात आले असून संबंधितांकडून १३ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाची नियमावली घोषित !

१९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती.

महाराष्ट्रात हिजाबला समर्थन असल्याचे दाखवण्यासाठी दैनिक ‘लोकसत्ता’कडून कर्नाटकमधील छायाचित्र वापरून दिशाभूल !

चुकीची माहिती देणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार ? हा हिंदुविरोधी अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे का ? याची चौकशी व्हायला हवी !

मुंबईत विनयभंगाच्या गुन्ह्यातील क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका !

आरोपीने वाईट हेतूने पीडितेला स्पर्श केल्याचे ठोस पुरावे न्यायालयात जोपर्यंत सादर केले जात नाहीत, तोपर्यंत संबंधित स्पर्शाला असभ्य भावनेने केलेला हल्ला म्हणता येणार नाही किंवा तिच्या विनयशीलतेचा अपमान झाला असेही म्हटले जाऊ शकत नाही.