(म्हणे) ‘भाजपने साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देऊन उमेदवारी दिली !’ – सचिन सावंत, काँग्रेस

इस्लामिक आतंकवादाविषयी काहीही न बोलणारे काँग्रेसी हिंदुत्वनिष्ठांना आंतकवादी ठरवतात ! – संपादक 

सचिन सावंत

मुंबई, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – कर्नल पुरोहित हा आंतकवादविरोधी कारवाईतील आरोपी आहे. अत्यंत गंभीर घटनेत सहभागी असलेल्या आरोपीसमवेत इतकी घनिष्ठता दिसून येत आहे. भाजपचे साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देत उमेदवारी दिली, अशी दर्पाेक्ती काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली. (मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुभांड रचल्याचा जबाब या खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात दिला आहे. – संपादक) भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या मुलीच्या विवाहाला मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उठून त्यांच्याशी हस्तांदोलन केले. याविषयीचा व्हिडिओ सचिन सावंत यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. यावर वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत सचिन सावंत यांनी वरील गरळओक केली. याविषयी प्रसाद लाड म्हणाले, ‘‘कर्नल पुरोहित माझे मित्र असून ते सैन्यात देशसेवा करत आहेत. याविषयी मला त्यांचा अभिमान आहे. देशसेवेसाठी झोकून देणार्‍या व्यक्तीचा आदर केला पाहिजे. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झालेला नाही.’’