जन्मोत्सवासाठी ५०० जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता

मुंबई – राज्याच्या गृह विभागाने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याविषयी कोव्हिडचे नियम शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याविषयी राज्यशासनाने गृह विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देऊन नियमावली जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्या ‘शिवज्योत दौडी’त २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरता ५०० जणांना उपस्थित रहाता येईल. १९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली असून कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !