मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणारी भाजप आणि मनसे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

ही याचिका २१ फेब्रुवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून याचिकाकर्त्यांना प्रत्येकी २५ सहस्र रुपये दंडही आकारला आहे.

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह अन्यांवर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश !

चित्रपटातील समाजविघातक दृश्यांना कात्री लावण्याचे काम चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे आहे. हे मंडळ त्याचे दायित्व योग्यरित्या पार पाडत नसल्यामुळे न्यायालयात अशी प्रकरणे नेऊन लोकांना आवाज उठवावा लागतो, हे संतापजनक !

कोकण विभागासाठी विनामूल्य पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

मुंबईतील ३ पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा नोंद !

जानेवारीमध्ये काही व्यापार्‍यांनी या पोलिसांच्या विरोधात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. यावर नगराळे यांनी विभागीय पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशीचा आदेश दिला होता.

गुरुपरंपरेची अपकीर्ती करण्याच्या षड्यंत्राला बळी पडू नका ! – धनंजय देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना

योग वेदांत सेवा समितीच्या वतीने विक्रोळी (मुंबई) येथे मातृ-पितृ दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

भांडुप (मुंबई) येथील हिंदुत्वनिष्ठ रितेश चव्हाण यांच्या घरी चौथ्या वर्षी शिवजयंती साजरी !

चार वर्षांपासून श्री. रितेश चव्हाण त्यांच्या घरी शिवजयंती साजरी करत आहेत. ते स्थानिक नागरिकांना निमंत्रण देतात. घरी शिवजयंती करण्यामागे त्यांच्या मातोश्री सौ. ज्योती चव्हाण यांची प्रेरणा आहे, असे त्यांनी सांगितले.

 एकनाथ खडसे यांच्या जावयाचा आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

पुण्यातील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. याच प्रकरणात गिरीश चौधरी यांना मागील वर्षी अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

ठाणे ते दिवा मध्य रेल्वेच्या ५ व्या आणि ६ व्या नव्या मार्गिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा कंदील !

या मार्गिकांमुळे आता रेल्वेप्रवास अधिक जलदगतीने होणार असून मध्य रेल्वे मार्गावर ३६ नव्या लोकल गाड्या चालू होत असल्याची घोषणा त्यांनी केली, तर काही वर्षांत ४०० ‘वन्दे भारत ट्रेन’ चालू करणार असल्याचे सांगितले.

लावण्याला न्याय मिळावा, यासाठी ‘अभाविप’कडून ‘रस्ता बंद’ आंदोलन !

‘लावण्या’ ख्रिस्ती होत नसल्यामुळे मागील २ वर्षांपासून शाळेतील ख्रिस्ती शिक्षिका तिला शौचालय स्वच्छ करणे, झाडू मारणे, भांडी धुवायला लावणे अशी कामे करायला सांगून तिचा मानसिक छळ करत होत्या. या त्रासाला कंटाळून लावण्या हिने विषप्राशन करून आत्महत्या केली.

(म्हणे) ‘भाजपने साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देऊन उमेदवारी दिली !’ – सचिन सावंत, काँग्रेस

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुभांड रचल्याचा जबाब या खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात दिला आहे