(म्हणे) ‘बुरखाबंदी प्रकरणी महाविद्यालयाच्या प्रशासनाला समज द्या !’ – आमदार रईस शेख

महाविद्यालयात हा नियम पूर्वीपासूनच लागू असतांना अद्यापपर्यंत कुणी याला हरकत घेतली नव्हती, मग आताच अशी मागणी का केली जात आहे ? बुरखा घालून मुले या महाविद्यालयातील मुलींना त्रास देत होती, याविषयी रईस शेख का बोलत नाहीत ?

शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका !

शिवाजी पार्कची ओळख ‘खेळाचे मैदान’ अशीच रहावी. या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही महनीय व्यक्तीचे स्मारक मैदानातील जागेत बांधण्यात येऊ नये, अशी जनहित याचिका प्रकाश बेलवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हिंदूच !

उपलब्ध कागदपत्रांनुसार अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हिंदूच असून त्यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडत असल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घोषित केले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक नियमावली शिथिल

आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. यामध्ये जोखमीच्या देशांतून येणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्याची आवश्यकता असणार नाही.

राजकारण्यांनी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद बंद करावा ! – पंडित हृदयनाथ मंगेशकर

पंडित हृदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, ‘‘लता मंगेशकर यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या, तरी ती पोकळी भरून निघणार नाही.

माफीचा साक्षीदार बनण्याची वाझे यांची सिद्धता !

पत्रात वाझे यांनी म्हटले आहे की, ‘या संदर्भातील संपूर्ण वस्तूस्थिती सक्षम न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास सिद्ध आहे. मला माफी देण्यात यावी.’

एस्.टी. कर्मचारी चर्चा करण्यास सिद्ध !

गेल्या ३ मासांपासून एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील ८ दिवसांपासून मुंबईत एस्.टी. कर्मचार्‍यांच्या बैठका चालू आहेत.

कोविड केंद्राच्या निविदेत भ्रष्टाचार ! – किरीट सोमय्या, भाजप खासदार

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पैशासाठी त्यांनी मुंबई आणि पुणे येथील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

(म्हणे) ‘हिजाबच्या विषयाला महत्त्व देऊ नका !’ –  दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून चालू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक उच्च न्यायालयात याविषयी सुनावणी चालू आहे.

पिस्तुलांची तस्करी करणार्‍या टोळीस अटक

डोंबिवली आणि कल्याण परिसरातून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणार्‍या ११ जणांना मुंबई आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १३ उच्च दर्जाची देशी बनावटीची पिस्तूले आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.