लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी अधिवेशनात पावले उचलू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

लव्‍ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्‍यक आहे. यंदाच्‍या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्‍या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्‍याने सहभागी झालेल्‍या अजित पवार यांचाही हिंदुत्‍ववादी सरकारला पाठिंबा आहे.

६४ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !

आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये )अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.  

बँडस्‍टँड (वांद्रे) येथे व्‍हिडिओ काढतांना समुद्रात बुडून पत्नीचा मृत्‍यू !

मागून समुद्राच्‍या मोठमोठ्या लाटा येत होत्‍या. त्‍या वेळी मुलाने आई-वडिलांना बजावलेही; पण त्‍यांनी ऐकले नाही. तितक्‍यात एक मोठी लाट आल्‍याने दांपत्‍य समुद्रात पडले. पती मुकेश सोनार याला लोकांनी वाचवले; पण पत्नी ज्‍योती सोनार (वय ३२ वर्षे) हिला वाचवता आले नाही.

प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्‍यातच कलंकित सरकार अपयशी ठरले आहे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्‍कार घातला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १६ जुलै या दिवशी विधानभवनात आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत केला.

मालाड (मुंबई) येथील मार्वे समुद्रात ५ मुले बुडाली !

यापैकी २ मुलांना वाचवण्‍यात आले असून ३ मुले बेपत्ता आहेत. त्‍यांचा युद्धपातळीवर शोध चालू आहे. ही सर्व मुले १२ ते १६ वर्षे वयोगटातील होती.

अधिवेशनामध्‍ये कुणाला तक्रार करण्‍याची संधी मिळणार नाही, असे काम करू ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाच्‍या पूर्वसंध्‍येला १६ जुलै या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज् संस्‍थेच्‍या वतीने आयोजित व्‍यावसायिक प्रदर्शन आणि विक्री महोत्‍सवाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज्‌चे संस्‍थापक तसेच बळीराज सेनेचे अध्‍यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्‍यात आला.

गुन्हा रहित होण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून याचिका प्रविष्ट !

देहली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात स्वतःवरील गुन्हा रहित होण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याचिका प्रविष्ट केली आहे.

… तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

कोणता पक्ष ‘शिवसेना’ याविषयी ३१ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय झाला नाही, तर या निवडणुकींसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना प्रतिकात्मक पक्षाचे नाव अन् चिन्ह द्यावे लागेल.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला वेग

मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.