गुन्हा रहित होण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून याचिका प्रविष्ट !

देहली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात स्वतःवरील गुन्हा रहित होण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याचिका प्रविष्ट केली आहे.

… तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

कोणता पक्ष ‘शिवसेना’ याविषयी ३१ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय झाला नाही, तर या निवडणुकींसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना प्रतिकात्मक पक्षाचे नाव अन् चिन्ह द्यावे लागेल.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला वेग

मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित निवडणुकांच्या दृष्टीने आमची सिद्धता चालू ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी आल्यास त्यादृष्टीने आमची सिद्धता चालू आहे. या दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्यास काही प्रमाणात अधिक ‘ईव्हीएम्’ यंत्रे लागतील. एका ईव्हीएम् यंत्रात १५ राजकीय पक्षांची नोंद ठेवता येते.

प्रख्‍यात तबलावादक उस्‍ताद झाकीर हुसेन यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्‍कार प्रदान !

उस्‍ताद झाकीर हुसेन यांनी ‘कलेच्‍या माध्‍यमातून मी महाराष्‍ट्र आणि देशाची सेवा केली. याची नोंद घेतली याविषयी मी कृतज्ञ आहे’, अशी भावना व्‍यक्‍त केली.

महाराष्‍ट्र शासन करणार महाराष्‍ट्राच्‍या बाहेर मराठीचा प्रचार !

महाराष्‍ट्र आणि महाराष्‍ट्राच्‍या बाहेर मराठीचा प्रचार-प्रसार करण्‍यासाठी शासन ५०० मराठी भाषा युवक मंडळे स्‍थापन करणार आहे. या मंडळांना राज्‍यशासनाकडून प्रतिवर्षी १० सहस्र रुपये इतके अनुदान दिले जाईल.

लव्‍ह जिहादविरोधी कायदा तात्‍काळ संमत करण्‍यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्‍ठान’ संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन !

या मागण्‍यांसाठी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !

मुंबई पोलिसांच्‍या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश !

‘सीमा हैदर परत आली नाही, तर भारताचा नाश’, असा त्‍यात उल्लेख असून या संपूर्ण कृत्‍याला उत्तरप्रदेश सरकार उत्तरदायी असल्‍याचे संदेशात म्‍हटले आहे.

मुंबईहून बँकॉकला अवैधरित्‍या परदेशी चलन नेणार्‍या थायलंडमधील ४ महिलांना अटक !

सातत्‍याने घडणार्‍या अशा स्‍वरूपाच्‍या गुन्‍ह्यांवर नियंत्रण आणण्‍यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने ठोस उपाय योजावेत !

‘पत्रकार कल्‍याण निधी समिती’वर ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट’चे संपादक स्‍वप्‍नील सावरकर यांची निवड !

राज्‍यातील ७ प्रतिष्‍ठित माध्‍यमांतील प्रतिनिधींचा या समितीमध्‍ये ‘अशासकीय सदस्‍य’ म्‍हणून समावेश करण्‍यात आला आहे. त्‍यामध्‍ये श्री. स्‍वप्‍नील सावरकर यांचा समावेश आहे.