मुंबई – कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज् या संस्थेने ९ जुलै या दिवशी दादर येथील गावस्कर सभागृहात व्यावसायिकांच्या मालाचे एकदिवसाचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे प्रथमच आयोजन केले होते. यामध्ये मुंबई, ठाणे, कोकण आणि पुणे येथील संस्थेच्या सभासद व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेच्या प्रयत्नांना यश मिळत असून लवकरच या क्षेत्रात संस्था आपले स्थान निर्माण करेल, असे मनोगत अनेक व्यावसायिकांनी या वेळी व्यक्त केले. तसेच एकमेकांच्या सहकार्यातून व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य करण्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. यापुढेही संस्था अधिक क्षमतेने अशा कार्यक्रमांचे आयोजन करील, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.
सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ प्रदर्शन
या महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. अनेकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादने आणि ग्रंथ घेतले. या ठिकाणी प्रदर्शन लावण्यासाठी आणि संस्थेच्या कार्याविषयी बोलण्यास आयोजकांनी संधी दिली, त्यासाठी सनातन संस्थेच्या सौ. शर्मिला बांगर यांनी आयोजकांचे आभार मानले. या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज्चे संस्थापक तसेच बळीराज सेनेचे अध्यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्थेच्या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्यात आला.